भोरः आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील शिवनेरी मंगल कार्यालयात शिवसेना शिंदे गटाची कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीचे आयोजन युवा सेनेच्या वतीने करण्यात आले होते. या बैठकीला मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या बैठकीला युवासेना अध्यक्ष पूर्वेश सरनाईक ही देखील आवर्जून उपस्थित होते. सरनाईक यावेळी बोलताना म्हणाले, यावर्षी संधी मिळणार नाही. लोकांनी याआधी जी चूक केली, ती २०२४ च्या निवडणुकीत केली जाणार नाही. लोकं धनुष्यबाणालाच विजयी करतील, असा विश्वास व्यक्त करीत त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचा सल्ला सरनाईक यांनी कार्यकर्त्यांना दिला.
भोर विधानसभेसाठीचा उमेदवार हा धनुष्यबानाचा असेल व हि जागा शिवसेनेला मिळणार हे निश्चित असल्याचा विश्वास शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांनी यावेळीी बोलताना व्यक्त केला. तसेच महायुतीचा जो उमेदवार देणार त्याचा प्रामाणिक प्रचार केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आपण आपलं व्हिजन घेऊन मतदारपर्यंत पोहचले पाहिजे. पत्रकारांनी आम्ही केलेले काम जनतेपर्यंत पोहचवले पाहिजे. हि दिवाळी जोरात झाली पाहिजे. महायुतीचा आमदार आला, तर भोर विधानसभेमध्ये सुवर्णकाळ आल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत कोंडी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
यावेळी निलेश घारे युवा सेना जिल्हा प्रमुख, सोमनाथ कुटे युवा सेना उपजिल्हा प्रमुख, कुलदीप तात्या कोंडे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना शिंदे गट, अमोल पांगारे माजी पंचायत समिती सदस्य, दशरथ जाधव तालुका उपाध्यक्ष, मुळशी तालुका प्रमुख दीपक करंजावणे, स्वप्निल सातपुते युवा तालुका प्रमुख मुळशी तालुका, रेणुका रोकडे युवती सेना तालुका प्रमुख मुळशी, निलेश गाडे युवा अध्यक्ष भोर तालुका, नितिन साळुंखे भोर शहर प्रमुख किरण साळी सचिव युवा सेना, नितीन सोनवणे शहरप्रमुख भोर, आबा करंजावणे मुळशी तालुका प्रमुख, स्वप्निल गाडे तालुका प्रमुख भोर, योगेश लिम्हण युवासेना संघटक वेल्हे तालुका, सागर कडू, माऊली कोकाटे युवासेना उपतालुका प्रमुख, प्रसाद घोडेकर, गणेश निगडे उपजिल्हा प्रमुख, अक्षय सणस युवा सेना उपतालुका प्रमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कुलदीप कोंडेची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे करणार
प्रत्येक युवकाने 200 मतदारपर्यंत पोहचले पाहिजे. त्यासाठी युवा सेना सक्रिय झाली पाहिजे. हा विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्यामुळे पुढेही हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला पाहिजे. येणाऱ्या विधानसभामध्ये मी, विजय बापू शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिफारस करणार आहोत की, कुलदीप तात्या कोंडे यांना संधी मिळाली पाहिजे. विजय बापू यांच्या नेतृत्वाखाली भोर विधानसभेमधील उमेदवार देखील निवडूण आला पाहिजे. कारण पुरंदरमध्ये विजय बापू शिवतारे हे निवडूण येणार आहेत. प्रत्येक युवा सैनिक यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला पाहिजे. महायुती सरकारच रिपोर्ट कार्ड हे घराघरामध्ये पोहचवले पाहिजे.
-पूर्वेश सरनाईक युवा अध्यक्ष शिवसेना
आमचा सर्व ठिकाणी उमेदवार एकनाथराव शिंदे
माझी मनापासून इच्छा आहे की कुलदीप कोंडे हे भोर विधानसभा मतदारसंघमध्ये आमदार झाले पाहिजेत. निर्णय वरच्या पातळीवर काही घेतले जातील पण मला जर कोणी विचारले तर माझे उत्तर हेच असेल. १० वर्ष जो माणूस भोरच्या डोंगर दऱ्यांमधून जय भवानी जय शिवाजीचा गजर करीत आहे. सर्वसान्यांची कामे सोडवण्यासाठी झटत आहे. आमचा सर्व ठिकाणी उमेदवार एकनाथराव शिंदे आहे. याचे कारण म्हणजे वसंतदादानंतर संवेदनशीपणे काम करणारा माणूस म्हणून एकनाथराव शिंदे यांचे नाव घेतले जाते.
-मा. मंत्री विजय शिवतारे