सारोळे: येथील न्हावी आणि पेंजळवाडी गावात विविध विकास विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम खंडेनवमीच्या शुभ मूहूर्तावर पार पडला. पुणे जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत महायुतीच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून आणि भोर-राजगड-मुळशीचे युवा नेते, पुणे जिल्हा नियोजन समितीचे मा. सदस्य विक्रम खुटवड, पुणे जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मा. आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, भोर तालुका भाजपा अध्यक्ष जीवन कोंडे, शिवसेना अध्यक्ष अमोल पांगारे या सर्वांच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७७ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, पुणे जिल्हा परिषदेचे मा. सदस्य चंद्रकांत बाठे, भोर तालुका भाजपा अध्यक्ष जीवन कोंडे, भोर तालुका शिवसेना अध्यक्ष अमोल पांगारे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश निगडे, भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रकाश तनपुरे, भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केदार देशपांडे, भोर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल धुमाळ, शिवसेनेचे युवा नेते शिवभक्त विकासबापू चव्हाण, बारामती लोकसभा मतदार संघाचे युवा अध्यक्ष स्वप्निल कोंडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश खोपडे, नथुराम गायकवाड, अमीर बाठे तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
भविष्यात देखील निधी मिळणारः जगताप
भालचंद्र जगताप यांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती देऊन भविष्यात सुद्धा यापेक्षा अधिकचा निधी आपल्याला मिळणार असल्याचे सांगितले. त्यासाठी महायुतीचे सर्वजण कटीबद्ध आहोत असे सांगून जेष्ठ नेते अजितदादांनी महायुतीच्या माध्यमातून गोर-गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच सर्व समाज घटकांसाठी मोफत तसेच अनुदानासह अनेक लोकोपयोगी योजना आणल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
सांगता सभेसाठी आलेल्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक गावचे मा. सरपंच अजित शिंदे यांनी केले. तसेच गावांच्या वतीने राजगड सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ज्येष्ठ नेते रवि सोनवणे, भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शिवसेनेचे युवा नेते, पेंजळवाडीचे माजी युवा सरपंच विकासबापू चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच आलेले सर्व नेते पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.