भोर – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोर, वेल्हा व मुळशी तालुक्याचे युवा नेते विक्रमदादा काशिनाथराव खुटवड यांच्या पुढाकाराने भोंगवली- कामथडी जिल्हा परिषद गटातील ५५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश मूर्ती वाटप करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे विविध मंडळांच्या पसंतीनुसार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, लालबागचा राजा, टिटवाळ्याचा महिरपवाला गणपती तसेच हत्ती फर्निचर शैलीतील गणेश अशा विविध प्रकारच्या मूर्तींचे वितरण करण्यात आले. या मूर्ती अमर सुपकर यांच्या कारखान्यातून उपलब्ध करून देण्यात आल्या.
गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असल्याने ग्रामीण भागातील मंडळांना मूर्ती वाटप करून सामाजिक सलोखा व सेवा वृत्तीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न युवा मंचतर्फे करण्यात आला. भोंगवली गटातील मंडळांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विक्रमदादा खुटवड युवा मंचतर्फे यापूर्वीही सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवले गेले असून समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचून सेवा करण्याचा ध्यास या मंचाने घेतला आहे. खुटवड यांच्या प्रेरणेतून हे उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमाला युवा मंचचे सचिव नथुराम गायकवाड, धनेश डिंबळे, श्रीकांत जामदार, सचिन सोंडकर, माऊली राऊत, कुमार खुटवड, प्रदीप खुटवड, अमीर बाठे यांच्यासह युवा मंचचे सर्व शिलेदार उपस्थित होते.
या उपक्रमामुळे भोंगवली- कामथडी गटातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा आदर्श या माध्यमातून उभा राहिला आहे.