जेजुरीः येथील एसटी बसस्थानकातच्या रस्त्याच्या बाजूला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून जेजुरी पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दि. १३ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जेजुरी एसटी स्थानकाच्या रस्त्याच्या बाजूला एका अनोळखी पुरुष वय वर्ष अंदाजे ५५ ते ६० मृतदेह जेजुरी पोलिसांना मिळून आला. सदर मताचे पोस्टमार्टम जेजुरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर मायताचे डोक्याला काळे पांढरे केस, दाढी वाढलेली, अंगात फिक्कट गुलाबी रंगाचा टी शर्ट व खाकी कलरची पॅन्ट आहे. सदर मयताबाबत जेजुरी पोलीस येथे दगडू धर्मजी बुनगे, वय 56 वर्ष, व्यवसाय वाहतूक नियंत्रक जेजुरी, राहणार वाल्हे कामटवाडी पुरंदर, जिल्हा पुणे, यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे खबर दिली होती. त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मयताची नोंद करण्यात आली आहे. सदर मयताबाबात काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधिकारी दीपक वाकचौरे यांनी केले आहे.