भोरः भाटघर धरणाशेजारील संगमनेर माळवाडी ग्रामपंचायतीच्या संरपंच गावाचा कारभार विचारत न घेता हाकत असल्याचा आरोप करीत ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा भोर गटविकास अधिकारी यांच्याकडे दिले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांपैकी ५ सदस्यांनी गावाच्या सरपंच यांच्या एकहाती कारभारमुळे सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात आले आहे.
सदर राजनामे गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे यांच्याकडे दिले आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीलाही पोस्टाने राजीनामा पाठवले आहेत. संगमनेर-माळवाडी गावच्या सरपंच सायली यांनी सदर सदस्यांना विचारात न घेता कारभार करीत असल्याचा आरोप या सदस्यांनी केला आहे. ९ सदस्यांपैकी आत्माराम आबुराव बांदल, अमोल प्रकाश शेलार, अनिल भगवान पवार, मनीषा कृष्णकांत नेवसे, शुभांगी अक्षय देशमुख या पाच सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.
संगमनेर-माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या ५ सदस्यांनी माझ्याकडे पदाचे राजीनामा दिले आहेत. तसेच हे राजीनामे संगमनेर ग्रामपंचायतीकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत.भा
किरणकुमार धनावडे गटविकास अधिकारी