भोरः येथील जुन्या पुलाखाली बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. दोनच दिवसांपूर्वी मयत व्यक्तीची बेपत्ता असल्याची तक्रार भोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. ज्ञानेश्वर बबन वाघ (वय ८४ वर्ष)
रा.मशालीचा माळ, वाघवाडा एसटी स्टँड भोर ता. भोर जि. पुणे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ही मयत व्यक्ती प्रोस्टेस्ट या आजाराने ग्रस्त होती. पुढीस तपास पोलीस करीत आहेत.