भोरः तालुक्यामधील एका गावात अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यास बालसुधारगृहात नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचे पडसाद आता येथील गावात उमटू लागले असून, आरोपीस कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ या गावातील महामार्गच्या फाट्याजवळ निषेध आंदोलन नोंदविण्यात आले.
या आंदोलनासाठी भारतीय जनता पार्टीचे भोर तालुका अध्यक्ष जीवन आप्पा कोंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शलाका कुलदीप कोंडे, सरपंच राणी संतोष शेटे, सरपंच निलेश भोरडे, हरिदासची काळाने, विक्रांत भोरडे, दादा जाधव, सागर सोंडकर, प्रवीण सोंडकर तसेच या गावातील महिला आणि युवती तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपराध्याला कडक शासन करण्यात यावे, अशी विनंती राजगड पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे.