भोर: येथील एका गावात एक अजब प्रकार समोर आला आहे. सासरच्या माणसाचे लग्नात मानपान व्यवस्थित झाले नसल्याच्या रागातून सुनेला मारहाण तसेच तिचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये लग्नात सासरच्या माणसाचा मानपान व्यवस्थित झाला नसून, “तु तुझ्या आई-वडिलांकडून पैसे आण”, अशी सतत मागणी करत सुनेला घरात हेडंसाळ, तिचा छळ व मारहाण करीत असल्याने अखेर पीडितेने याला वैतागून भरोसा सेल पुणे ग्रामीण कार्यालयात अर्ज केला. त्यानुसार भोर पोलीस स्टेशनमध्ये पती सच्चितानंद श्रीनाथ वेताळ, सासरे श्रीनाथ एकनाथ वेताळ, सासू अनिता श्रीनाथ वेताळ, नणंद उर्मीला श्रीनाथ वेताळ ( सर्व रा. दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ४ मे २०२२ रोजी सच्चितानंद वेताळ यांच्यासोबत रितीरिवाजप्रमाणे विवाह झाला होता. परंतु हा विवाह सासरच्या मंडळीच्या मानपाननुसार झाला नसल्यामुळे सासरची मंडळी फिर्यादी यांचा छळ करु लागले. तुझ्या माहेरावरून पैसे आण, अशी मागणी करत तिला मानसिक छळ करुन वेळोवेळी त्रास देत होते. कालांतराने फिर्यादी या गरोदर राहिल्यावर त्यांना दोन मुले झाली. तरी देखील पती, सासरे, सासू , नणंद हे छळ करत राहिले. तसेच लहान मुलांचा संभाळ करत असताना सासरे गैरवर्तन करत असून सुनेचा छळ करत होते. विवाहितीने माहेर वाशीबाबत हा घडलेला प्रकार कधीच उघडकीस आणू दिला नसताना देखील आई-वडिलांकडून पैसे आण, अशी मागणी वेळोवेळी होत होती. तसेच तुझ्या नातेवाईकांचा मारहाण करणे, अशी धमकी देत असे. शेवटी फिर्यादी या सगळ्याना कंटाळून त्यांनी भरोसा सेल पुणे ग्रामीण यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यानुसार भोर पोलीस स्टेशनमध्ये पती, सासरे, सासू , नणंद यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.