भोरः आंबाडे येथील केंद्र शाळेतील सर्व शिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालवडी शाळेत संपन्न झाली. निपुण भारत अंतर्गत ३ ते ९ वयोगटातील विद्यार्थ्यांचे भाषा व गणित विषयातील पायाभूत स्तर उंचावणे, पॉसको कायदा, सखी सावित्री समिती रचना व कार्य, प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती मार्गदर्शन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तज्ञ मार्गदर्शक रविंद्र थोपटे, अमर क्षीरसागर, छाया बढे यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिला आणि फौजदारी कायदे या विषयावर केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी बालवडी शाळेचे मुख्याध्यापक भीमराव शिंदे, सहशिक्षक महादेव बदक, आनंदा सावले, अंजना घोलप यांनी सहकार्य केले.