पारगांव: प्रतिनिधी धनाजी ताकवणे
देलवडी ग्रामस्थ, जय मल्हार ग्रंथालय आणि वाचनालयाच्या संचालक मंडळांनी सव्वातीन लाख रुपये जमा करत देलवडी येथे आईचं बन (फेज टू) साकारले आहे. याचे उद्घाटन दौंडचे तहसिलदार अरूण शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की,
कोविड कालावधीत म्हणजेच ३ वर्षांपूर्वी गावातील तरुणाई एकत्र आली. उच्चशिक्षित युवकांनी उजाड माळरानावर ६०० झाडांचे आईचं बन साकारले. त्यावेळी अवघ्या १ महिन्यामध्ये ४ लाख रूपये लोकवर्गणी गोळा करण्यात आली. गावातील प्रत्येक कुटंबातील व्यक्तीने आपल्या आईच्या नावे प्रेमाखातर प्रत्येकी एक झाड दिले, म्हणून या प्रकल्पाला आईचं बन असे नाव देण्यात आले. आत्ता ४ वर्षानंतर आईच्या बनाच्या पुढच्या टप्यातील वृक्षारोपणासाठी ३ लाख रुपये लोकवर्गणी गोळा करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देलवडी व जय मल्हार विद्यालय देलवडी या शाळेच्या १९९० स्थापनेपासूनच्या सर्व शिक्षकांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले. उपस्थित आजी माजी शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंढरीनाथ भाडळे, दत्तात्रय पवार, कुसुम डोंबाळे, दिलीप खवळे, सुभाष बांदल, अनिल नवले, आनंद भोसले, उत्तम जावळे, उत्तम कुभांर, माधवी सोमवंशी, हर्षल देशमुख, ऊषा आडागळे, सुदर्शना शेलार, छगन खळदकर, सुजाता जावळे, भास्कर वाबळे, सुनील चौधरी, विक्रम बेंद्रे, चंद्रकांत कोकडे, विष्णु शिंदे, संपत कदम, रुपेश पोमणे, शिवदास शिंदे, संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
भीमा पाटसचे संचालक विकास शेलार म्हणाले की, देलवडी गावांमध्ये १०० इंजिनियर व ४० शिक्षक आहेत. या सर्वांच्या एकत्रीकरणातून जय मल्हार ग्रंथालय व वाचनालयाची स्थापना झाली. व्याख्यानमाला, वृक्षारोपण, वाचनालय व अभ्यासिका, किल्ले स्पर्धा आदी उपक्रम या वाचनालया मार्फत राबवले जातात. कार्यक्रमाला बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी वाघोले, माजी सरपंच नीलम काटे, वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश शेलार, महादेव शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बनामध्ये पाणीपुरवठा व श्रमदान करणाऱ्या अनिल शेलार, दत्तात्रय शेलार, राजेंद्र बंड, सचिन शेलार, प्रकाश जाधव, मंगेश भालेराव, योगेश भोसले, गणेश शेलार, दीपक देसाई, हेमंत शेलार यांचा सत्कार करण्यात आला.