भोर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे लाडके, कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने भोर येथील अनंतराव थोपटे फार्मसी कॉलेज हॉल व श्री. छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेज, धांगवडी येथे भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन भोर-राजगड-मुळशीचे मा.आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमात विशेषतः शालेय विद्यार्थी, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिरात तब्बल २०७ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. तसेच ३७०० वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी आमदार संग्रामदादा थोपटे यांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक करत सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तालुक्यातील जनतेच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे “देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासोबत भोर-राजगड-मुळशी तालुक्याचाही सर्वांगीण विकास होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला भाजप राज्य परिषद सदस्य बाळासाहेब गरुड, भोर तालुका दक्षिण मंडळ अध्यक्ष रवींद्र कंक, उत्तर मंडळ अध्यक्ष संतोष धावले, राजगड तालुका अध्यक्ष राजूभाऊ रेणुसे, भोर शहर अध्यक्ष पल्लवी फडणीस, मानद सचिव स्वरूपाताई थोपटे, युवा नेते पृथ्वीराज थोपटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य जीवन कोंडे, जि.प. सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समिती उपसभापती रोहन बाठे यांच्यासह विविध मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.