भोरः शहरात व ग्रामीण भागात जागतिक वडापाव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वडापाव विक्रेत्याचा सत्कार करण्यात आला.
शहरात ४० वर्षांपुर्वी २० पैशाला वडापाव मिळायचा. शहरातील सर्व सामान्य जनता, खाद्य प्रेमी, खवय्यांनी जागतिक वडापाव दिना निमित्ताने शहरातील वडापाव बनवणारे व आण्णा वडेवाले, दिघेपाटील हॅाटेल येथील वडापाव बनविणाऱ्या विठठल दिघे व आकाश दिघे यांचा भोर तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार विजय जाधव, सुर्यकांत किंद्रे, सारंग शेटे,अर्जुन खोपडे, दिपक येडवे, इम्रान आतार यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मगील अनेक वर्षांपासून लोकांची भुक भागविण्याचे काम हे वडापाव विक्रेते करीत असून रुचकर चविष्ट फास्टफुड म्हणून परिचित असलेला सर्वसामान्यांना परवडेल असा भारतीय खाद्य पर्दाथ तो म्हणजे वडापाव. अगदी कुठेही सहज उपलब्ध होतो. गरीबापासून ते श्रीमंतांपर्यंत प्रत्येकजण आवडीने वडापाव खातात. कारण वडापाव खायला ना प्लेट लागत ना चमचा लागतो. जितक्या लवकर बनतो तितक्याच लवकर फस्त केला जातो. अनेक ठिकाणी शाळा, कॅालेज, आँफिस कँन्टिनमध्ये वडापाव आसतोच विदयार्थी, पालक, शिक्षक यांना वडापाव आवडीने खातात.
जागतिक वडापाव दिनाच्या निमित्ताने भोर शहरातील खवय्यांनी वडापाव विक्रेत्यांच्या दुकानावर जाऊन वडापाव विक्री करणाऱ्या मालकांचा सत्कार केला. यामुळे वडापाव मालक भारावून गेले आणी विक्रेत्यानी आभार व्यक्त केले.
आण्णा वडेवाले काळया मसाल्यातील वडापाव
भोर शहरातील अनंतराव थोपटे काँलेजवर दहा वर्षांपुर्वी ओमसाई कँफे हाँटेल सुरु केले. सध्या हाँटेलात काळ्या मसाल्यातील चवीष्ट आणी रुचकर आण्णा वडापावाची विक्री फक्त १० रुपयात केली जाते. यात बटाटे वडा, चिज वडा, कढीवडा, मेवनिजवडा बनवला जातो. कमीत कमी वेळेत सर्वसामान्य नागरिकांची भूक भागवण्याची क्षमता वडापावामध्ये आहे. चविष्ट, रुचकर आणी गरमागरम वडापाव पुरवणे हे उदिष्ट मगील दहा वर्षांपासून सुरू आहे.
-विठठल दिघे व आकाश दिघे (वडापाव विक्रेते )
४० वर्षांपुर्वी मिळायाचा २० पैशाला वडापाव
आमचे वडील बबन मालुसरे यांनी ४० वर्षांपुर्वी २० पैशाला वडापाव विक्री सुरु केली. त्यानंतर भाऊ चंद्रकांत (पिन्ंटु) मालुसरे याने आणी सध्या मी वडापाव विक्री करत आहे. यात कुटुंब मदत करते. वडीलव भाऊ यांनी तयार केलेली वड्याची चव, रुचकरपणा आकार, सुहास गुणवत्ता टिकवून ठेवली आहे.
–शरद मालुसरे (वडापाव विक्रेता)