शिरवळ :नायगाव येथे यात्रेनिमित्त आलेल्या दोन व्यक्तींचा आज तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.दोघेही पुणे शहरातील रहिवासी होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत थिटे वय ४६ आणि रूद्र चव्हाण वय ७ , जांभूळवाडी रोड लिपाने वस्ती पुणे येथील रहिवासी असून दोघेही यात्रेनिमित्त नायगावला आले होते. आज सकाळी ते नायगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडून गेले.
स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि दोघांचेही मृतदेह तलावातून बाहेर काढले.मृतदेहांची शवपरीक्षा शिरवळ येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार आहे.
या घटनेबाबत शिरवळ पोलीस अधिक तपास करत आहेत.