भोर: पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी येथील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे वाहनांचे टायर फुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आरपिआय सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बाप्पु गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते रात्री दहा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्याच्या निर्णयाला आले आहेत.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, प्रशासन या समस्येवर योग्य तो निर्णय घेईपर्यंत ते रस्ता रोकून ठेवतील. या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या कारणाने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.