भोर : रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे भोर तालुक्यातील मंगळवार पेठेतील एका बांधकामस्थळी भिंत कोसळण्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या भिंतीच्या शेजारी असलेल्या दुकानाला मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीची भिंत काल पासून सुरू असलेल्या पावसामुळे कोसळली. यावेळी या भिंतीच्या शेजारी असलेले शब्बीर पापा भाई आतार यांचे घर व दुकान एकत्र असून अतिवृष्टीमुळे भिंत पडली आहे. दुकानातील मालमत्ताही यामध्ये नष्ट झाली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.