Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके 2 days ago
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल 3 days ago
Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम 3 days ago
Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल 4 days ago
Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 5 days ago
Next
Prev
Home खंडाळा

शिरवळ आणि खंडाळा परिसरात “दोन नंबर धंदे, एक नंबर मार्गाने !”  भाग १

by Team Rajgad Publication
June 1, 2024
0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलिसांसह प्रशासनाला बूस्टर डोस गरजेचा

शिरवळ : जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक मतदान झाले आता विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. आचारसंहिता अजून सुरूच आहे मात्र सर्वात मोठी गमतीची बाब म्हणजे दोन नंबर धंदे, एक नंबर मार्गाने शिरवळ,खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असल्याने नागरिकांच्यात मात्र वेगळीच चर्चा सुरू आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग शिरवळ ,खंडाळा परिसरात थोडं कमी लक्ष देत तर नाही ना ? काहीशी अशीच शंका नागरिक उपस्थित करत असून अन्नभेसळ,स्टेट एक्साईज,प्रदूषण मंडळ,हरित लवाद,वनविभाग,सुस्त पडल्याने अनेक बेकायदेशीर बाबी खुलेआम सुरू असल्याची चर्चा नागरिकांच्यात आहे.’कलेक्शन’ एजंट खरी वस्तुस्थिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळणार नाही याची तजवीज करत आहेत.तर वरिष्ठही मिळणारे ‘पाकीट’किती वजनदार आहे याचीच मोजदाद महिनाभर करीत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाल्याचे वास्तव आहे.

You might also like

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

राज्यात मागील काही दिवसात घडलेल्या अनेक दुर्दैवी घटना प्रशासनाची काळी बाजू दर्शविणाऱ्या आहेत परंतु यातून बोध घेईल ते प्रशासन कसले अशीही चर्चा घडत आहे.अनेक ठिकाणी गैरकारभार फोफावला असून सोयीस्करपणे याकडे डोळेझाक करण्याकडे कल वाढत चालला आहे.यामुळे सातारा जिल्ह्याचा सुसंकृतपणा लोप पावत चालला असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

आजपर्यंत पोलीस प्रशासन आणि अन्न भेसळ विभागाच्या अनेक कारवाया पूर्णत्वास गेल्या आहेत यामध्ये गुटखा,अवैध शस्त्र तस्करी अथवा नामचीन गुंडांना बेड्या ठोकणे अशा अनेक कारवाया पार पडल्या आहेत यामुळे गत काही दिवसात या ठिकाणी होणाऱ्या कारवाया थंड पडल्या की पाडल्या याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. तालुक्यातील काही ठिकाणी कायमस्वरूपी पोलिसांची गस्त असेल तर अनेक गैरकृत्यांना आळा बसेल अशी चर्चा स्थानिक परिसरात आहे.

अवैध दारू,गुटखा वाहतूक विक्री प्रमुख समस्या

शिरवळ आणि खंडाळा परिसरात होणारी अवैध दारू आणि गुटखा वाहतूक व विक्री रोखणे प्रशासन समोर प्रमुख आवाहन आहे अनेक सरकारी बाबू स्वतःच गुटखा सेवन करीत असल्याची ओरड नागरिक करत असल्याने कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार घडत आहे.यामुळे ‘हप्ते’किती मिळतात ते पाहू नका तर नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी होऊ लागली आहे.

शिरवळ परिसरात पोलिसांची दशहत हवी

एकेकाळी खंडाळा पोलिसांचा दरारा परिसरात मोठया प्रमाणात होता परंतु शिरवळ पोलीस ठाणे निर्माण झाल्यानंतर यामध्ये ढिलाई निर्माण झाल्याची चर्चा परिसरात असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई थंडावली असल्याची चर्चा नागरिक करत आहेत यामुळे परिसरातील पोलिसांचे नेटवर्क सक्षम करावे लागणार असून महामार्गावर असणारे क्षेत्र नेहमीच गुन्हेगारांच्या हिटलिस्टवर राहिले आहे.

प्रशासनाला बूस्टर डोस गरजेचा

लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रशासनात शिथिलता निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत असून अधिकारी सायलंट तर कर्मचारी शिरजोर झाले आहेत यामुळे चहा पेक्षा किटली गरम असल्याचा अनुभव येत असल्याची चर्चा शिरवळ,खंडाळा परिसरात होत आहे.प्रशासनातील सर्वच विभागांच्या प्रमुखांनी संबंधित विभागांना तंबी देणे गरजेचे असून दारू,गुटखा यांचा झालेला सुळसुळाट रोखणे महत्त्वाचे आहे.

तडीपार आरोपींचा सर्रास वावर?

शिरवळ , खंडाळा तालुक्यातून तडीपार करण्यात आलेल्या अनेक गुन्हेगारांचा शिरवळ आणि खंडाळा परिसरात सर्रास पणे वावर होत असून त्याची दहशत निर्माण करण्याची सवय मात्र तशीच आहे. परिसरात फिरून काही ना काही उलटे पालटे करणे हे तर नेहमीचेच आहे. पोलीस त्यांच्या परीने कारवाई करत आहेत परंतु कारवाई करून देखील त्यांचं जैसे थे आहे.

पोलिसांची दारू अड्यावर लुटूपुटू कारवाई ?

शिरवळ परिसरात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री केली जात असून कोणी सांगायला गेले तर तेवढ्यापुरती कारवाई करत पाठ फिरावताच तो अवैध व्यवसाय सुरू होतो. कारवाई करत असताना किरकोळ कारवाई म्हणजे  सातशे पन्नास ,आठशे पन्नास , पाचशे , नवशे अश्या स्वरूपातील मुद्देमाल दाखवला जातो परंतु या किरकोळ कारवाईने मोठे मासे तर तसेच बाकी असल्याचे देखील नागरिक बोलत आहेत तर या मुळे पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

खुलेआम अवैध  व्यवसायांच्या व्हिडिओ “राजगड न्युज” च्या हाती..

शिरवळ खंडाळा परिसरातील अनेक गावात खुलेआम गुटखा व मध्य विक्री करतानाच्या व्हिडिओ राजगड न्युजच्या हाती लागल्या असून यामध्ये सदर व्यक्ती घराच्या बाहेर एका बॉक्स मध्ये हातभट्टी दारू विक्री करत असताना दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये एका शेड मध्ये अनेक व्यक्ती दारू पिताना पाहायला मिळत आहेत.

कारवाई करून व्यवसाय पूर्णपणे बंद करावेत

पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात हे व्यवसाय बंद होतात. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने हे व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करून येथील व्यवसाय पूर्णपणे बंद करावेत, अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे.

क्रमशः पुढे वाचा … शिरवळ परिसरात अवैध व्यवसायचा हस्तक.. भाग २

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

June 22, 2025
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

June 21, 2025
ताज्या बातम्या

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

June 21, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

June 20, 2025
ताज्या बातम्या

Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

June 19, 2025
 “ही मदत केवळ प्रसिद्धीसाठी नाही, तर आपली सेवा करण्याचा मनोभाव ठेवून केली – चंद्रकांत बाठे 
भोर

 “ही मदत केवळ प्रसिद्धीसाठी नाही, तर आपली सेवा करण्याचा मनोभाव ठेवून केली – चंद्रकांत बाठे 

June 19, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

June 22, 2025
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

June 21, 2025

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

June 21, 2025

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

June 20, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.