मानसिंगबाबा धुमाळ यांच्या शेतात आढळला पक्षी , प्राथमिक उपचार करून वनविभागाच्या दिला ताब्यात
भोरला एसटी स्टँडच्या बाजुस मानसिंगबाबा धुमाळ यांची शेतजमीन आहे. सोमवारी सायंकाळी धुमाळ व त्यांच्या पत्नी वंदना धुमाळ हे शेतात फेरफटका मारत असताना धुमाळ यांना दुर्मिळ करकोचा जातीचा भला मोठा पक्षी जखमी अवस्थेत शेतात आढळला. त्यांनी त्वरित सदर पक्षाचा जीव वाचावा त्याचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी घरी नेला त्यावर घरगुती प्राथमिक उपचार करत , सदर पक्षी वनविभागाशी संपर्क साधुन भोरचे वनरक्षक व्ही आर आडाळगे यांच्या ताब्यात दिला . सदर पक्षी ताब्यात घेऊन त्यांनी त्यास पुढील उपचारासाठी पुण्यातील बावधन येथील रेस्क्यु सेंटरला नेण्यात आले. दुर्मिळ करकोचा जातीचा पक्षी असुन त्याच्या पंखाला इजा झाली आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.यावेळी आडाळगे यांच्या सोबत वनविभागाचे एस एम राठोड, अविनाश चव्हाण उपस्थित होते.