स्वच्छता हिच सेवा या उपक्रमाचे आयोजन
भोर नगरपालिकेकडुन नेहमीच आरोग्य, शैक्षणिक, स्वच्छता अशा बाबतीत नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. अशाच २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, स्वच्छ भारत अभियानुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर स्वच्छता हिच सेवा या उपक्रमांतर्गत आणि उपजिल्हा रुग्णालय भोर यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर या उपक्रमाचे आयोजन भोर नगरपालिकेकडुन मंगळवार (दि.०१) करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेच्या सर्व कर्मचा-याची आरोग्य तपासणी करण्यात आली. आणि त्यांना सुरक्षिततेसाठी PPE किटचे वाटप मुख्याधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, नगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी महेंद्र बांदल, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनिल पाटणे,लॅब टेक्निशियन योगेश इंगुळकर, नगरपालिकेचे अधिकारी राजेंद्र राऊत, नगर परिषदेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी, शिपाई उपस्थित होते.
या आरोग्य तपासणीत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची रक्तातील साखरेची पातळी, हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर अशा तपासण्या करण्यात आल्या.जवळपास ३० कर्मचाऱ्यांची तपासणी यावेळी करण्यात आली. तर कर्मचाऱ्यांना सुरक्षित राहण्यासाठी मास्क, सेफ्टी हॅंन्ड ग्लोज, सेफ्टी बूट,कपडे, काम करताना घालावयाचे जॅकेट्स असे PPE किट देण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेविषयी जागरूक राहून स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता असे सांगण्यात आले.