भोर – तालुक्यातील भाटघर धरण प्रकल्पग्रस्त वेळवंड खोऱ्यातील म्हाळवडी, बारे बुद्रुक, बारे खुर्द, बसरापूर गावांना स्थानिक आमदार निधी व नागरी सुविधा पुरविणे अंतर्गत मंजूर केलेल्या ३ कोटी ७६ लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन रविवार (दि.९)करण्यात आले. यामध्ये म्हाळवडी मधील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता १५ लक्ष, अंतर्गत रस्ता ५ लक्ष, हरिजन वस्ती पोहोच रस्ता ६५ लक्ष ५० हजार, तुकाबाई मंदिर येथे समाज मंदिर २० लक्ष बारे बुद्रुक मधील स्मशानभूमी पोहोच रस्ता ४० लक्ष, स्मशानभूमी शेड १० लक्ष,गवंडी आळी येथे काँक्रीट रस्ता २० लक्ष, थोपटे आळी ते लक्ष्मण दानवले यांच्या घरापर्यंत रस्ता ५ लक्ष, काळभैरवनाथ मंदिर येथे समाज मंदिर २० लक्ष, तसेच बारे खुर्द येथील स्मशानभूमी पोहोच रस्ता ४० लक्ष, अनंता बदक ते नवीन पाण्याची टाकीपर्यंत रस्ता ५ लक्ष, पोहोच रस्ता २३ लक्ष ७३ हजार,अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण ५१ लक्ष ८५ हजार आणि बसरापूर आनंदवाडीमधील अंतर्गत रस्ता ५ लक्ष, स्मशानभूमी पोहोच रस्ता ३५ लक्ष, अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण ९ लक्ष ८४ हजार, दत्त मंदिर सभा मंडप ५ लक्ष, अशा अनेक कामांचे भूमिपूजन व उद्घाटन माजी आमदार थोपटे यांनी केले.तसेच आमदार यांनी बसरापुर आनंदवाडीच्या दत्तमंदिराला आणखी ५ लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही आश्वासन दिले.
यावेळी सदर कार्यक्रमास राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पोपटराव सुके, मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती धनंजय वाडकर, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आंनदा आंबवले, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक उत्तमराव थोपटे, भाटघर धरणग्रस्त पुनर्वसन सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल वरखडे, सचिव काळुराम मळेकर, बाजार समितीचे संचालक विठ्ठल गोरे, भाऊ मळेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक पै वसंतराव वरखडे, म्हाळडीचे निवृत्ती बुवा बोडके, विठ्ठल मोकाशी, दिगंबर बोडके, महेश बोडके, आण्णा बोडके, बारे बुद्रुक येथील गणेश मळेकर, माऊली दानवले, रामचंद्र शिंदे, गणेश आंबवले, चेअरमन शंकर दानवले, संतोष दानवले, अशोक दानवले, माजी सरपंच सागर दानवले, सुनील दानवले, बारे खुर्द सरपंच सविता संदीप गायकवाड, उपसरपंच दिपक खुटवड, माजी उपसरपंच सुरेश खुटवड, दिलीप मांढरे, सदाशिव बदक, सागर बदक, हनुमंत बदक, बसरापुरचे पोलीस पाटील विठ्ठल झांजले, दत्तात्रय पवार, मोहन पवार, शिवाजी झांजले, विष्णू (बबन) झांजले, चंद्रकांत झांजले, तानाजी झांजले, उपसरपंच रामदास झांजले, मेघा पवार, छाया पवार, दत्तात्रय बदक, कुंडलिक बदक, संपत झांजले, माऊली साळुंके, प्रदिप झांजले, सौरभ झांजले, प्रविण झांजले, अजित पवार, मंगेश पवार, अभिजित झांजले, शांताराम झांजले, जेष्ठ नागरिक राजाराम झांजले, सिताराम पवार वेळवंड खोऱ्यातील असंख्य कॉग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व तरुण वर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रमांची सांगता बसरापुर आनंदवाडी येथे झाली.