भोर, २८ ऑक्टोबर – राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांपैकी महत्त्वाच्या भोर विधानसभेत यंदा संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर यांच्यात अटीतटीची लढत रंगणार आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, महायुतीने शंकर मांडेकर यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.
महायुतीतर्फे मांडेकर यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली असून, ते उद्या २९ ऑक्टोबर रोजी भव्य शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या संख्येने समर्थक सहभागी होण्याची शक्यता आहे.
भोर मतदार संघाच महत्व
भोर विधानसभा मतदार संघ हा नेहमीच चर्चेत राहणारा आणि विशेषतः यंदाच्या निवडणुकीत आणखीच लक्ष वेधून घेणारा मतदार संघ आहे. आघाडीच्या वतीने संग्राम थोपटे यांची मजबूत पकड असतानाही मांडेकर यांचेही समर्थन वाढत आहे, यामुळे दोघांत काटयाची टक्कर अपेक्षित आहे.
भोर मतदार संघातील ही थरारक निवडणूक स्थानिक राजकीय परिस्थितीत महत्त्वाचे बदल घडवून आणू शकते.