वेळवंड खोरे सोशल फाउंडेशनकडुन विविध उपक्रम
वेळवंड खोऱ्यातील पसुरे (ता.भोर) येथील लोकनियुक्त विद्यमान सरपंच प्रवीण ऊर्फ पंकज धुमाळ यांनी आपल्या अलिकडेच झालेल्या (दि.२९ जून) वाढदिवसादिवशी अनावश्यक खर्च टाळून या भागातील विविध गरजूंना मदत केली.वेळवंड खोरे सोशल फाउंडेशनकडुन विविध उपक्रम राबवत एक हात मदतीचा पुढे करत ही मदत करण्यात आली .

आपल्याच गावातील युवक दत्तात्रय लक्ष्मण खोपडे याचा मागील महिन्यात मोठा अपघात होऊन डोक्याला व पायाला गंभीर दुखापत इजा झालेली होती तो सध्या धायरी पुणेतील सिल्वर ब्रीच हॉस्पिटल उपचार घेत असुन त्या दिवशी येथे जाऊन त्याची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करत त्यास छोटीशी मदत केली. त्यांना रक्कम रुपये १०,००१ /- चा धनादेश वेळवंड खोरे सोशल फाउंडेशन मार्फत देण्यात आला व आपल्या वाढदिवसाच्या दिवशी गरजूला मदत करण्याचा प्रयत्न केला . यावेळी सोबत उद्योजक तुषार पडवळ, प्रतीक धुमाळ उपस्थित होते. सदर युवकाचे आई वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले असुन या युवकला हॉस्पिटल खर्च मोठा येत असल्याने ही मदत करण्यात आली.
तसेच बारे – म्हाळवडी माध्यमिक विद्यालय, बारे बुद्रुक, पसुरे त्यांनी माध्यमिक विद्यालय ,समर्थ विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय वेळवंड, शासकीय आश्रम शाळा पांगारी या वेळवंड खोऱ्यातील शाळांमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. एकूण ७५ विध्यार्थ्यांना पॅड, वहि पेन ,पट्टी, पेन्सिल अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप”वेळवंड खोरे सोशल फाउंडेशन “तर्फे करण्यात आले. त्या प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सरपंच पंकज धुमाळ, विकास सोसायटी चेअरमन रामचंद्र देशमुख, सुरेश धुमाळ, आप्पा झांबरे , उपसरपंच अनंत सणस, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, शिपाई व मोठ्या संख्येने शिपाई उपस्थित होते.
