भोरः तालुक्यात विविध उपक्रमांनी शासकीय कार्यालये ग्रामंपायत, शाळा, महाविदयालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. तसेच स्वातंत्र्यदिनाचेऔचित्य साधत स्वातंत्र्य सेनानीचा सत्कार करण्यात आला. तहसिल कार्यालयात उपविभागीय अधिकारी डॅा. विकास खरात यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम थोपटे( sangramthopate) यांच्या हस्ते स्वातंत्र्यसेनानी नारायण काराळे यांचा सन्मान करण्यात आला. तहसिलदार राजेंद्र नजन,नायब तहसिलदार अरुण कदम, अजिनाथ गाजरे, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे मुख्याधिकारी श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार, उपनिरीक्षक अनिल चव्हाण, उपअधिक्षक भूमीअभिलेख विकास गोफणे स्वरुपा थोपटे, रणजीत शिवतरे, भालचंद्र जगताप, शैलेश सोनवणे, जीवन कोंडे, संतोष घोरपडे, प्रमोद गुजर, विठठल शिंदे, रविंद्र बांदल, जगदीश गुजराथी, सिमा तनपुरे, स्वाती गांधी, गितांजली शेटे शाळांचे विदयार्थी उपस्थित होते.
राजगड ज्ञानपीठाच्या (rajgaddaynapeth) अनंतराव थोपटे माहाविदयालय व जिजामाता इंग्लिश मिडियम स्कूल येथे संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी संस्थेच्या सचिव स्वरुपा थोपटे, प्राचार्य प्रसन्नकुमार देशमुख, रुबीना सय्यद, स्वाती मोटकर व विदयार्थी उपस्थित होते. भोलावडे ग्रामपंचायत सरपंच प्रविण जगदाळे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी अविनाश आवाळे उपसरपंच गणेश आवाळे माजी उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन आवाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय अब्दागिरे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सरपंच पदाचे मानधन विद्यार्थ्यांच्या विमा संरक्षणाकरिता
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने सरपंच प्रवीण जगदाळे यांनी ग्रामपंचायत मधील सरपंच पदाचे मिळणारे मानधन शाळेतील ७५ विद्यार्थ्यांना विमा संरक्षण कवच यासाठी देऊन एक आगळे वेगळे दातृत्व दाखवले. त्याबद्दल सर्व पालकांनी व शाळेने सर्वांनी त्यांचे विशेष कौतुक केले. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील पाच वर्षांसाठी सर्व प्रकारचा दोन लाख रुपयांचा विमा संरक्षण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी यातून उपलब्ध होणार आहे. भोर शहरातील सर्व शासकीय कार्यालय तर ग्रामीण भागातील शाळा कॅालेज ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.