भोर : आगामी येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी भोर तालुक्यातील ८ गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सोमवार दि.१३ ऑक्टोंबर २०२५ रोजी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात आणि तहसीलदार राजेंद्र नजन,नायब तहसीलदार अरूण कदम व इतर शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. आरक्षण सोडती पुढील प्रमाणे.
भोर तालुका पंचायत समिती ८ गणांचे आरक्षण
१) नसरापूर – सर्वसाधारण
२) वेळू – सर्वसाधारण –
३) कामथडी – सर्वसाधारण (महिला) –
४) भोंगवली – सर्वसाधारण –
५) भोलावडे – नागरिकांचा मागास प्रवर्ग –
६) शिंद- सर्वसाधारण (महिला)
७) उत्रोली- सर्वसाधारण (महिला)
८) कारी – नागरिकांचा मागास प्रवर्ग –(महिला)
पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले असल्याने अनेक गणातील महिलांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.
भोर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद ४ गटांचे आरक्षण सोमवारी (१३ ऑक्टोबर) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वीच पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण पुरुषांसाठी जाहीर झाले होते. त्यामुळे भोर तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गटातील आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज हे आरक्षण निश्चित झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.पुणे जिल्हा परिषद निवडणूक २०२५ भोर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत आज सोमवार दि.१३ ऑक्टोंबर २०२५ रोजी पुणे येथे पर पडली. आरक्षण सोडती पुढीलप्रमाणे
पुणे जिल्हा परिषद भोर तालुका ४ गटांचे जाहीर झालेले आरक्षण…
१) वेळू – नसरापूर गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग
२) भोंगवली – कामथडी गट : सर्वसाधारण
३) भोलावडे – शिंद गट : सर्वसाधारण
४) उत्रोली – कारी गट : सर्वसाधारण
या आरक्षणामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे राजकीय गणिते बदलले असून पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सर्वसाधारण असल्याने अनेकजण भुवया उंचावून आता नक्की कोण उमेदवार? असे म्हणत अनेकांमध्ये चूरश तर अनेक भागात निवडणूकीचे वातावरण तयार झाले आहे काहींना संधी मिळणार तर काहींचे उमेदवारीचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील आघाड्या, पक्षांतर, आणि नवे गट- तट तयार होण्याचे संकेतही राजकीय वर्तुळात उमटत आहेत.

















