भोर : तालुक्यातील पसुरे,करंदी परिसर तसेच वेल्ह्यातील राजगड किल्याच्या पायथ्याला मर्गासानी परिसरातून लाल मातीची तस्करी केली जात आहे. यामध्ये महसूल विभाग शांत करण्यासाठी स्थानिक तहसील मधून पाचशे ब्रास वाहतूक परवाना काढला जातो. या नाममात्र पाचशे ब्रास उत्खननाच्या नावावर पाच हजार ब्रास उत्खनन केले जात आहे. शेतकऱ्याना एका हायवा डंपर मागे एक हजार रुपये हातात टेकवून ही माती तब्बल पंचवीस हजार रुपये हायवा डपरच्या माध्यमातून विकली जात आहे.
म्होरक्यांकडून मलिद्याचे वाटप
माती तस्करी करीत असताना एक हाजार रुपये नाममात्र शेतकऱ्याच्या पदरात पडल्यावर उर्वरित चोवीस हजार रुपयाचा मलिदा कोण कोणाला वाटला जातो. यामध्ये महसूल अधिकरियांचा हिस्सा,पोलीस अधिकारी हिस्सा,आरटीओ अधिकाऱ्यांचा हिस्स, स्थानिक गुन्हेगारी व नेत्यांच्या हिस्सा ,जेसीबी चालक, वाहन चालक, पक्षाचे नामधारी मंडळी यांचा मेळ बसून शिल्लक दहा हजार रुपये या सगळ्याच्या करता धरता असलेल्या म्होरक्याच्या हाती राहतात. या दहा हजार रुपयांच्या साठी उठाठेव करणाऱ्या म्होरक्याला चार ते पाच महिन्यात कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळते.
कशी केली जाते तस्करी…
एक महिन्याचा नाममात्र परवाना घेऊन याच पाचशे ब्रास च्या जोरावर दिवसाला एका वाहनाच्या दोन ट्रिप केले जातात म्हणजे दिवसाला नव्वद ते एकशे वीस ब्रास मातीची तस्करी केली जाते तर बावीस ते पंचवीस दिवसाच्या कालमर्यादेत तब्बल पाच हजार ब्रास मातीची तस्करी केली जाते.
पाचशे ब्रासच्या उत्खननात सुमारे पंधरा ते सोळा गाड्यांचा समावेश असतो याच्याच उत्खननाच्या आलेख काढला तर पाच हजार पेक्षा जास्त उत्खण होते.भोर तालुक्यातून सुमारे तीस गाड्यांच्या माध्यमातून मातीची तस्करी केली जाते.
भोर तालुक्यातील मातीची कापूरहोळ मार्गे वाहतूक करून इतर तालुक्यात प्रवेश केला जातो त्याच प्रमाणे वेल्हा तालुक्यातील माती वाहतूक करून नसरापूर मार्गे पुन्हा कापूरहोळ मार्गे इतर तालुक्यात प्रवेश वाहने करत आहेत. नियम सर्व धाब्यावर ठेऊन वाहने प्रमाण पेक्षा जास्त भरणे, बरधाव वेगाने चालवणे, कोणतेही झाकण न टाकने, हेतर नेहमीच पाहायला मिळत आहे.परंतु यांना सहकार्य मात्र स्थानिक पोलीस करत असतात.
या सगळ्यांना तोंड देऊन म्होरक्या तब्बल अंदाजे दोन लाख ते पाच लाख तर महिंन्याच्या या आकड्यांचा आलेख खूप होत असून कोट्यवधी रुपयांचा उलाढाल होत आहे. या सर्वावर प्रशासकीय अधिकारी पांघरून घालण्याचे काम करीत आहेत.
तर यावर जिल्हाधिकारी,उत्खनन जिल्हाधिकारी अधिकारी यांनी खालील महसूल विभागाचा सखोल अभ्यास करून चाललेल्या माती तस्करीवर अंकुश लावून नैसर्गिक साधन संपत्ती अपरह्यास टाळावा. या सर्व तस्करीला कारणीभूत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिकांमधून होऊ लागली आहे.
निसर्गाचा मोठ्या प्रमाणात -हास..
मुळातच भोर वेल्हा हा तालुका पहाता अती पर्जन्यमान व निसर्गाची नटलेला आहे याच तालुक्यात टेकडीफोड करून शेतजमीन सपाटिकरणाच्या नावाखाली येथील माती उरुळी कांचन व दौंड पट्यात नर्सरी व पॉलिहाऊस यांना दिला जात हे सर्व उघद्या डोळ्याने दिसत असून देखील कारवाई होत नाही यामुळे स्थानिक गुन्हेगारी वाढली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सोप्या पद्धतीने गुन्हेगारीला खत – पाणी घालण्याचे काम सुरू असून यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
भोर व वेल्हा तालुक्यात बेकायदा मातीचे उत्खनन अथवा रॉयलटीपेक्षा जास्त मातीची विक्री केली असेल तर लवकरच पथक लावून कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील. तसेच याबाबत दोन्ही तहसीलदारांना सूचना करण्यात येतील.
– उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे