भोर (कुंदन झांजले) : गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस असताना ऐन गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात एसटीची चाके थांबली असून आज पासून संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे. कारण एसटी कामगारांने संयुक्त कृती समितीच्यावतीने आजपासुन बेमुदत धरणे आंदोलनाचा पुकारले आहे. त्यामुळं आता गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात एसटीची सेवा बंद झाल्याने प्रवाशांसह, विद्यार्थी वयोवृद्ध नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.
एसटी कामगारांच्या समितीने काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये एसटी कामगारांचे वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांएवढे करावे, ही प्रमुख मागणी केली आहे.त्यामुळे एसटी कामगार काम बंद ठेवून धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी बंद झाली तर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
भोरला आज मंगळवारचा दिवस आठवडे बाजार असल्याने बाहेर गावाहून अनेक नागरिक येत असतात तसेच अनेक शाळा महाविद्यालयातुन विद्यार्थी येत आहेत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसह, वयोवृद्ध , प्रवासी नागरिकांचे हाल व गैरसोय झाल्याचे दिसून आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन असल्यामुळे भोर आगाराचे सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी असल्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था अनिश्चित काळापर्यंत बंद आहे.
आगार व्यवस्थापक रा.प.भोर