भोर : सेवा पंधराव्या अंतर्गत महसूल विभागाकडून रायरेश्वर किल्यावर स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड रेशन कार्ड ची कामे,संजय गांधी निराधार योजना आरोग्य तपासणी करण्यात आली.रायरेश्वरला महाभिषेक करण्यात आला. भोर महसूल विभागाकडून राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वी अभियान अंतर्गत सेवा पंधराव्या निमित्ताने रायरेश्वर किल्ल्यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रांत डॉ विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, नायब तहसीलदार वैशाली घोरपडे, शिवाजी राऊत, प्रीतम गायकवाड, रुपाली गायकवाड, पांडुरंग लहरे, एम.एस शेख, मनोज ढवळे, प्रवीण माने, धमदीप शिकरे, श्रद्धा कांबळे, शंकर किंद्रे, नावजी किंद्रे, किसन किंद्रे, तुकाराम किंद्रे, नारायण जंगम, किसन जंगम, गोपाळ जंगम, राजद्रे किंद्रे, पांडुरंग किंद्रे, नवनाथ भालेघरे, विठ्ठल राऊत, तानाजी मैंद, धीरज दानवले, अभिजित बोराटे, तलाठी, मंडल अधिकरी, महसूल विभागाचे कर्मचारी, वनविभाग, आरोग्यविभाग, रायरेश्वर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बालाजी काशीद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान दिले. प्रास्ताविक तहसीलदार राजेंद्र नजन यांनी सेवा पंधरवडा निमित्त राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती यावेळी दिली. यावेळी रायरेश्वर किल्ल्यावर वृक्षारोपण करण्यात आले आणि किल्ला परिसरात व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी करण्यात आली तर संजय गांधी निराधार योजनेच्या नागरिकांची कामे व रेशनिंग कार्ड बाबत कामे करण्यात आली.यावेळी नागरिकांच्या विविध अडचणी समजून घेऊन प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणूक करण्याच्या सूचना यावेळी प्रांताधिकारी डॉ विकास खरात संबंधित विभागांना दिल्या .

















