भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील आंबवडे येथील घोरपडेवाडीमधील तरुणाने मंगळवार (दि.९)राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार आंबवडे (ता.भोर)घोरपडेवाडीतील ३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरामध्ये लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याची घटना घडली. गळफास घेतलेल्या तरुणाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भोर येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला असे डॉक्टरांकडुन सांगण्यात आले. प्रवीण नामदेव घोरपडे (वय३१ वर्ष) रा.आंबवडे घोरपडेवाडी ता.भोर असे मृत तरुणाचे नाव आहे . या प्रकरणी मृत्यू तरुणाच्या चुलत भावाने भोर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करपे करीत आहेत.