भोर : शहराच्या नजिक असणाऱ्या भोलावडे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उत्रौली गावचे उद्योजक अतुल शिवतरे यांनी एक हात मदतीचा पुढे करत शालेय उपयोगी वस्तू वाटप केल्या.या शाळेतील जवळपास ७० ते ८० विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या वस्तूंमध्ये पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉपनर, पट्टी ,वह्या अशा अनेक शालेय उपयोगी वस्तूं होत्या. यावेळी अतुल शिवतरेंसह गावचे विद्यमान सरपंच प्रविण जगदाळे, उपसरपंच अविनाश आवाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पडवळ, बंडा तारू ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय अब्दागिरे, शाळेचे मुख्याध्यापिका शर्मिला गायकवाड, शाळेचे शिक्षक प्रा.अनिता लोहोकरे, प्रा मनोज जगताप, प्रा.यशवंत कंक, गावातील ग्रामस्थ, महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.