भोर: प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांची विकास कामे करण्यात आली असून, पुढील काळात शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे काम केले जाणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केली. तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील गावांना थोपटे यांनी भेट देत गावकऱ्यांची अडचणी समजून आगामी काळात त्या प्राधन्याने सोडणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला. त्यांच्या गावभेट दौऱ्याला येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वीसगाव खोरे हे माझे कुंटूंब असून येथील जनता कायम भक्कमपणे पाठीशी आहे. ज्या ठिकाणी प्रचारासाठी जात आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, ते याचा वेगळा अर्थ काढून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचा आरोप थोपटे यांनी यावेळी बोलताना केला. माझा मतदार सुज्ञ असल्यामुळे असल्या भूलथापाना बळी न करता येणाऱ्या २० नोव्हेंबरला त्यांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार असल्याचा विश्वास थोपटे यांनी व्यक्त केला.
यावेळी भोर तालुका काँग्रेस आय पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, माजी उपसभापती मानसिंग धुमाळ, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, माजी सरपंच विठ्ठल शिवतरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख माऊली शिंदे, तालुकाप्रमुख हनुमंत कंक, राजगडचे संचालक उत्तम थोपटे, युवा नेते अनिल सावले, शिवसेना जिल्हा संघटक प्रसाद शिंदे, माजी सभापती बाळासाहेब थोपटे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आनंदराव आंबवले, कार्याध्यक्ष भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट संदीप नांगरे, माझी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘या’ गावांना भेट देत साधला नागरिकांशी संवाद
आंबेघर पोम्बर्डी, शिरवली, वेनवडी, उत्रोली, वडगाव डाळ, भाबवडी, हातनोशी बाजारवाडी मानकरवाडी,धावडी, पळसोशी, वरवडी खुर्द, वरवडी डायमुख, वरवडी बुद्रुक, नेरे, अंबाडे कोळेवाडी, बालवडी गोकवडी, निळकंठ पोळवाडी खानापूर या भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्याताली गावांना थोपटे यांनी भेट दिली.