भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
किराणा माल खरेदीवरही आकर्षक भेटवस्तू
भोरला दि.१५ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर कालावधी पर्यंत दसरा दिवाळी फेस्टीवल धमाका चालू झाला असून गतवर्षी प्रमाणे यावर्षीही भोरला मोबाईल खरेदी , इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर आणि सोने चांदी खरेदीवर दुचाकी जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.शहरातील स्थानिक दुकानातून खरेदी करण्याचे आवाहन भोर शहरातील दुकानदारांनी केले आहे.
भोर शहरातील दिप मोबाईल शॉपी , श्री इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी , डिजिटल आय मोबाईल शॉपी, आशीर्वाद इलेक्ट्रॉनिक्स , ओम एंटरप्राईजेस, ओम अप्लायंसेस, अरिहंत मोबाईल शॉपी, चोकशी वालचंद ज्वेलर्स , वामा ज्वेलर्स अशा नामांकित दुकानांमध्ये ऑफर उपलब्ध असून सदर दुकानातून खरेदी केल्यावर विविध सवलत सुविधा व भेटवस्तू देण्यात येणार आहेत या दिवाळी फेस्टिवल मध्ये एकूण 51 बक्षिसे असून 12000 रकमेच्या पुढील खरेदीवर दिवाळी कुपन मिळणार आहे.व या कूपनचा लकी ड्रॉ पद्धतीने नंबर काढण्यात येणार आहे.यामध्ये बजाज फायनान्स ,टीव्हीएस फायनान्स, क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड झिरो टक्के डाऊन पेमेंट व्याजदर अशा सवलती असणार आहेत बक्षिसांमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस दुचाकी टू व्हीलर असून एलईडीटीव्ही ,फ्रिज ,वॉशिंग मशीन , पीठ गिरणी ,मोबाईल, लॅपटॉप, अशा मोठमोठ्या वस्तू जिंकण्याची संधी ग्राहकांना असणार आहे.
ऑनलाइन खरेदीवर होणारी लोकांची फसवणूक ,होणारे तोटे लक्षात घेता ,ऑनलाइन पेक्षा कमी किमतीत वस्तू, फायनान्स सुविधा देत सोबत आकर्षक भेटवस्तू स्थानिक दुकानदारांकडून खरेदी केल्यावर ग्राहकांना मिळणार असल्याचे भोरमधील प्रसिद्ध मोबाईल व्यावसायिकदार प्रमोद शेटे, अमित ओसवाल, शिरीष चव्हाण यांनी सांगितले. तसेच हि दिवाळी गोड होण्यासाठी किराणा मालाच्या खरेदीवरही शहरातील किराणा दुकानात आकर्षक भेटवस्तू व विशेष ऑफर देण्यात आल्या आहेत.