भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले
भोर तालुक्यातील न-हे (ता.भोर) येथील अंकुश वीर यांची भोर तालुका जागृत ग्राहक राजा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली असून पुणे येथील आर्यन स्कूल कॉर्पोरेट ऑफिस नऱ्हे येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत संघटनेचे संस्थापक दिलीप फडके, सचिव नागनाथ स्वामी, एम. के. गावडे यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
सचिव स्वामी यांनी संघटनेची ध्येय,कार्य, उद्दिष्टे, कार्यकर्ता कसा असावा, अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. तर फडके यांनी संघटना निस्वार्थी काम करत असून जिल्ह्यात खेडोपाडी शाखा स्थापन करुन ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याशिवाय बांदल यांचेसह उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पुणे शहराध्यक्ष नवनाथ बांदल, राज्य उपाध्यक्ष वसुधा सावरकर, महिला राज्याध्यक्षा शैला शिळमकर, महानगर महिला अध्यक्ष दुर्गा शुक्रे, राज्य महिला सचिव सविता बलकवडे, जिल्हाध्यक दिलीप निंबाळकर, संघटक बाळासाहेब घोगरे, महिला जिल्हा अध्यक्षा वैशाली आडसरे, सचिव संतोष शिर्के,अपर्णा पंडीत यांसह पदाधिकारी उपस्थित होते.