रस्त्याला मोठ- मोठे खड्डे आणि संबंधित विभागाच्या नियोजन शून्य उपाययोजना
भोर- पसुरे- पांगारी मार्गे असणारा शिळीम रस्ता हा सध्या होत असलेल्या पावसाने जागोजागी मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्यावर मातीचा खच, दगड ,खडी , वाळु आले आहेत. खड्ड्यामुळे रस्त्यावर पाण्याची डबकी तयार झाली आहेत. रस्ताची गटारे बुजलेली आहे .रस्ता अरूंद असल्याने साईट पट्टी खचली आहे. रस्त्यावर माती , पाणी आल्याने वाहने घसरून छोटे-मोठे अपघात घडत आहेत तसेच रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी झाल्याने वळणा-पिळनावरील रस्ता झाडामुळे दिसेनासा झाला आहे त्यामुळे समोरून येणारे वाहने कळत नाही व दिसत नाहीत. तसेच दिशा फलक झाडांच्या वेलीत गायब झाले आहेत. अशा प्रकारे हा रस्ता खराब झाला असल्याचे निवेदन नागरिकांमार्फत वेळवंड विकास सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ राजीवडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहे. सदरच्या रस्त्याचे दुरुस्तीकरण तात्काळ करा अन्यथा या भागातील नागरिकांना घेऊन मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी संबंधित विभागास दिला आहे.
रस्ता सुरू होतानाच भोलावडेतील पेट्रोलपंपा जवळ वजन काट्याच्या शेजारी मोठाले खड्डे सुरू झाले आहेत. बारे खुर्द ,बारे बुद्रुक, म्हाळवडी ,कर्नवडी, तसेच पसुरे ,राजघर ,वेळवंड , साळुंगण बाजुची गावे व शेवटी साळव अशा अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे असुन पावसाचे पाणी रस्त्यावर वाहून पाण्याची छोटी मोठी तळी साचल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी त्वरित रस्ता दुरुस्त करण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रुस्ता दुरुस्ती करण्यासाठी केलेले प्रयत्न हे निष्फळ झाले आहेत. ज्या ठिकाणी खड्डे आहेत अशा ठिकाणी दुरुस्ती, खड्डे करण्यासाठीचे प्रयत्न अपुरे पडले आहेत.खड्ड्यांवर टाकलेला भरावा पावसाने उद्धडुन जात आहे उलट पहिल्यापेक्षा जास्त मोठे खड्डे पडत आहेत. तसेच संबंधित विभागाने नियोजनपूर्वक चांगल्या उपायोजना तालुक्यातील सर्वच रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत राबवण्यात याव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.