भोर – महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही योजना १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर राबवायचं ठरवलं आहे .भोर तालुक्यात विविध गावांमधुन ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून या अभियानाचा (दि.१७) शुभारंभ करण्यात आला असून तालुक्यातील गाव स्तरावरील सर्व घटकांना समान न्याय ,समान संधी निर्माण करणे. कुठलाच घटक विकासापासून वंचित राहणार नाही, यासाठी नियोजन बद्ध प्रयत्न करणे, गावासाठी चांगल्या प्रतीच्या मूलभूत सुविधा निर्माण करणे, गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी ,उत्तम आरोग्य सुविधा, पक्की घरं, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन करणे, सुशासनाच्या माध्यमातून शासन स्तरावरील सर्व सेवा नागरिकांना जलद आणि सुलभरीत्या कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणे , निसर्गसंवर्धन करणे, गावांमधील पाण्याचा अपव्यय टाळून गाव हरित आणि जलसमृद्ध करणे , ग्रामस्थांच्या सहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, महिला बचत गट, शेतकरी बचतगट तसेच विविध विषयांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उपजिविकेचे साधन निर्माण करणे ,लोकवर्गणी, मननरेगा योजना, व इतर योजनांच्या अभिसरणातून गावातील मूलभूत सुविधा परिपूर्ण करणे अशा अनेक मुद्यांवर गावातील नागरिक आणि ग्रामपंचायत स्तरावरील ,पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, महिला बचतगट, तरूण मंडळे या सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून गावागांमध्ये निकोप स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून हे अभियान राबवायचे आहे. या अभियानाच्या स्पर्धेत सात प्रकारचे निकष उद्दिष्ट नेमून दिलेले आहेत त्यामध्ये १) सुशासनमुक्त पंचायत, २) सक्षम पंचायत ( स्वनिधी लोकवर्गणी ), ३) जलसमृद्ध स्वच्छ व हरितगाव , ४) मनरेगा व इतर योजनांचा अभिसरण ,५) गाव पातळीवर गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे , ६) उपजीविका विकास गृहनिर्माण सामाजिक न्याय , ७) लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत.
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानासाठी शासनाने २४५ कोटींच्या वर पुरस्काराच्या भरीव निधीची तरतूद केलेली असुन , प्रत्येक तालुक्यामध्ये ४५ लाख रुपयांची पुरस्काराची रक्कम मिळणार आहे. पहिले बक्षीस १५ लाख ,दुसरे बक्षीस १२ लाख ,तिसरे बक्षीस ८ लाख रुपये आणि उत्तेजनार्थ दोन ग्रामपंचायतीसाठी अनुक्रमे ५ लाखाची दोन बक्षिसे, अशी एकूण ४५ लाख रुपये तालुक्यातील पाच गावांना मिळणार आहेत. गुणांवर आधारित ही स्पर्धा असून यातील सात उद्दिष्टांचे मूल्यमापन करून गावाचे क्रमांक ठरवले जाणार आहेत.भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय जाधव , यांनी भोर तालुक्यातील सर्व सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधून या अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे तसेच तालुक्यातील आठ मध्यवर्ती ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी सरपंच उपसरपंच यांच्या बैठका घेऊन लोकांमध्ये उत्साह वाढवला आहे. दिनांक १७ सप्टेंबर या दिवशी तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्रामसभा पार पडल्या. ग्रामसभेला मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला तज्ञ अधिका-यांची नेमणूक करण्यात आली होती . गावांमध्ये जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. प्रत्येक गावामध्ये श्रमदान करण्यात आले . भोर तालुक्यातील नसरापूर, देगाव, नायगाव ,रांजे, माळेगांव, हायवे बु. , भोंगवली, कामथडी, नांदगाव, आंगसुळे , खानापूर, नाझरे, भोलावडे, बसरापुर, बारे खुर्द, बारे बुद्रुक, म्हाळवडी, गोरड म्हसवली अशा अनेक गावातुन स्वच्छता, जनजागृती, ग्रामसभा सभा घेऊन अभियानास प्रारंभ केला. जनतेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना बाबत प्रचंड उत्साह दिसत असून नागरिक मोठ्या उत्साहाने अभियानात सहभागी होत आहे असे पंचायत समिती विभागाकडून सांगण्यात आले.
भोर तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी ,अधिकारी कर्मचारी नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या भोर तालुक्याचे नाव राज्यपातळीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय जाधव साहेब व विस्तार अधिकारी खंडाळे यांनी केले आहे..

















