भोरः भोर एज्युकेशन सोसायटी संचलित राजा रघुनाथराव विद्यालयातील गरीब, मागासवर्गीय विद्यार्थिनींना कॅनरा बँक भोर शाखेच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली आहे. बँकेचे व्यवस्थापक कुलदीप पवार यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे प्रमोद गुजर, संस्थेचे सचिव गौर, विद्यालयाचे मुख्याध्यापक भांगे सर, उप मुख्याध्यापक कडू सर, पर्यवेक्षिका मोरे मॅडम उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना बँकेचे व्यवस्थापक पवार यांनी ही शिष्यवृत्ती बँकेच्या मेगा सीएसआर अभियानांतर्गत डॉक्टर आंबेडकर विद्या ज्योती शिष्यवृत्ती अंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील एससी व एसटी संवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाते. पाचवी ते सातवीपर्यंत प्रत्येकी तीन हजार, तर आठवी ते दहावीपर्यंत प्रत्येकी पाच हजार रुपये दिले जातात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच बँकेच्या अनेक योजनांबद्दल देखील त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम शिंदे यांनी केले .या प्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कॅनरा बंकेच्या मेगा सीएसआर अभियान अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्या ज्योति शिष्यवृति योजनेमधील पाचवी ते दहावीतील वर्गतील एससी व एसटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यींच्या खात्यात शिष्यवर्तीचे पैसे जमा करण्यात आले. तसेच पाचवी ते सातवी प्रत्येकी विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये, तर सातवी ते दहावीच्या ३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात आले.