विक्रम शिंदे: राजगड न्युज
भोर दि.१४ :भोर शहराला भाटघर धरणातून पाणीपुरवठा केला जातो.सध्या भोर ते कापूरव्होळ या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून रस्ते कामासाठी खोदाई करताना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नीरा देवघर कॉलनी परिसरात फुटल्याने शरीरातील काही भागाचा पाणीपुरवठा उद्या( दि.१५) बंद राहणार असल्याचे समजते.
भोर शहरातील विद्यानगर ,संजय नगर, चौपाटी ,रामबाग, मंगळवार पेठ ,मशालीचा माळ ,श्रीपती नगर या भागांचा यात समावेश आहे.दि.१६ रोजी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा केला जाईल असे पालिका प्रशासनाने कळवले आहे .
याबाबत पालिका मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांचेशी संपर्क साधला असता अधिक माहिती मिळू शकली नाही.मात्र माजी नगरसेवक जगदीश किर्वे यांनी दुजोरा दिला असून उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होत असल्याने उत्सवाच्या काळात ,नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पाणीपुरवठा बंद राहत असल्याने नागरिकांनी मात्र असमाधान व्यक्त केले. या निमित्ताने पाणीपुरवठा करण्याची पर्याय उपाय योजना करण्यास पालिका असमर्थ ठरत असल्याने नियोजन शून्य कारभाराचा सामान्य नागरिकांना फटका बसत आहे .