दगडेपाटील मागील नऊ वर्षे राबवित आहे हा समाजपयोगी उपक्रम
गेल्या ९ वर्षांपासून अखंडपणे कोथरूड – बावधन मध्ये सुरु असलेला दिवाळी फराळ साहित्य वाटप हा समाजपयोगी उपक्रम आता भोर-मुळशी-राजगड मधील नागरिकांसाठी देखील राबविण्याला जात आहे. तालुक्यातील प्रत्येक बांधवांची दिवाळी आनंदाने, समृध्दीने पार पडावी यासाठी प्रयत्न दगडे पाटील हा उपक्रम राबवत आहेत असे त्यांनी सांगितले. ह्या दिवाळीत देखील आपला हा दिवाळी फराळ साहित्य उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. यासाठी नाव नोंदणी करून दिनांक २६ ते ३० सप्टेंबर कालावधीत कूपन वाटप करण्यात येणार आहेत. आज गुरुवार २६ तारखेला सकाळ पासूनच राजवाडा चौक भोर येथील किरण दगडेपाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात तालुक्यातील गावागावातून मोठ्या प्रमाणात महिलां पुरूषांची गर्दी मोठी उसळली आहे. सदर रस्ता शासकीय कार्यालयांचा रहदारीचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली आहे.
या दिवाळी फराळ किराणा किट साहित्य मध्ये १ किलो रवा ,१ किलो बेसण पीठ, अर्धा किलो पीठीसाखर,१ किलो मैदा , अर्धा किलो डालडा,१ किलो तेल ,१ किलो भाजके पोहे ,भाजकी डाळ मोती साबण, सुगंधी उटणे, पणती, रांगोळी, चिवडा मसाला ,मीठ असे साहित्य मिळणार आहेत.
तालुक्यातील नागरिकांना काशी विश्वेश्वर देवदर्शन,बाळुमामा – महालक्ष्मी देव दर्शन, पुणे येथील गणपती देव दर्शन, महिलांना रक्षाबंधन भेट, आरोग्य शिबीरे, फराळ वाटप,नेत्र तपासणी शिबिर अशा अनेक उपक्रमातून किरण दगडे पाटील यांनी एक दानशूर दाता, आधुनिक काळातील श्रावणबाळ अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.येणा-या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा कडुन प्रमुख दावेदार म्हणून किरण दगडे यांना मानले जात आहे.तालुक्यात अशा गर्दीने विरोधकांना धडकी भरेल असे वातावरण तयार झाले आहे.