नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा ; नदी पात्रात न उतरण्याचे आवाहन
भोर – सध्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने भोर तालुक्यातील धरणातील पाणी साठ्यात भरमसाठ वाढ झाली आहे. भाटघर धरण ९५.२९% झाले असल्याने धरणाचा पाणीसाठा नियंत्रित करणेसाठी रात्री ८:३० वाजता भाटघर धरणाच्या विद्युत केंद्रांमधील होणा-या निसर्गात वाढ करून एकूण ३२८१ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे.
तसेच निरा देवघर धरण ८५ % टक्के भरले असून या धरणाच्या सांडव्याच्या पाण्यातुन ३,४८४ क्यूसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे.
तसेच पावसाचे प्रमाण कमी/जास्त झाल्यास त्यानुसार धरणाच्या पाणी पातळीत वाढ/घट झाल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी/जास्त करण्यात येणार आहे असे पाटबंधारे विभागाकडुन सांगण्यात आले आहे. तरी सर्वांना संबंधित प्रशासनाकडुन आवाहन करण्यात आले आहे की. कृपया नदीपात्रात नागरिकांनी उतरू नये नदीच्या पात्रात कोणत्याही विभागाचे काम सुरू असेल तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. तसेच नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.