उन्नती महिला प्रतिष्ठानच्या व तनिष्का व्यासपीठाच्या अध्यक्षा सीमा तनपुरे यांचा आणखी एक उपक्रम
भोर – भोरमधील उन्नती महिला प्रतिष्ठान व तनिष्का व्यासपीठ शहरात नेहमीच नव नवीन उपक्रम राबवत असतात असाच एक सामाजिक उपक्रम म्हणजेच बहिण भावाच्या अतूट नात्याचा सण रक्षाबंधन शासकीय कार्यालय, पोलीस स्टेशन, पत्रकार संघ यामधील पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक अशा असंख्य नागरिकांना राख्या बांधून यावर्षीचे रक्षाबंधन साजरे केले.
उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा तनपुरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या महिला भगिनींना सोबत घेऊन हा सण साजरा केला. भोर शहरासह , ग्रामीण भागातही उन्नती महिला प्रतिष्ठान व तनिष्का व्यासपीठाच्या महिला असेच नवनवीन सामाजिक उपक्रम राबवत असते. यावर्षीही गतवर्षीप्रमाणे उन्नती महिला प्रतिष्ठान व तनिष्का व्यासपीठ भोर तालुका यांच्या वतीने रक्षाबंधन प्रांत ऑफिस , तहसीलदार ऑफिस , भोर पोलिस स्टेंशन , दोन्ही पत्रकार संघ येथे जाऊन राख्या बांधण्यात आल्या यावेळी भोरचे प्रांत अधिकारी डॉ विकास खरात, नायब तहसीलदार अरुण कदम , महसुल नायब तहसीलदार आदिनाथ गाजरे , गोविंद गाडे ,भोर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आण्णा पवार , विकास लगस , पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के , भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सारंग शेटे, उपाध्यक्ष विलास मादगुड, पत्रकार संघाचे सदस्य कुंदन झांजले , दत्तात्रेय बांदल , संतोष ढवळे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत सागळे,व सर्वच कार्यालयतील स्टाफ या सर्वांना राख्या बांधुन रक्षाबंधन दिवस साजरा केला. या वेळी उन्नती महिला प्रतिष्ठान आणि तनिष्का व्यासपीठाच्या अध्यक्षा सीमा तनपुरे, भाग्यश्री वरटे, द्रोपदी भेलके , अरुणा कुमकर, संध्या झगडे, मनिषा पडवळ या माता बघिणी उपस्थित होत्या.
समाजातील प्रत्येक घटकाला