प्रति पंढरपूर म्हणून भेलकेवाडीच्या विठ्ठल मंदिराची ओळख ; १९९५ साली मंदिराची स्थापना
भोर – शहरातील भेलकेवाडीच्या विठ्ठल मंदिराची स्थापना १९१५ साली झाली असून तेव्हापासून या मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा सोहळा मोठ्या उत्साहात चालू आहे , या मंदिराची १०९ वर्षांची काकड आरतीची अखंडीत परंपरा भेलकेवाडी मध्ये सुरु आहे, यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
भेलकेवाडीतील सर्व महिला दररोज पहाटे ५ वाजता सडा पाणी मारून याठिकाणी मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात काकड आरती करतात . कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी या आरतीला सुरवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेला काकड आरतीची समाप्ती होम हवन करून महाप्रसाद वाटप करून या काकड आरतीचा शेवट होतो, मंडळामध्ये वर्षभर सांप्रदायिक कार्यक्रम , अखंड हरिणाम सप्ताह हे देखील कार्यक्रम या ठिकाणी गेली ६० वर्ष अखंडीत होत आहे यामध्यही येथील नागरिकांचा मोठा उत्साह मिळत आहे , सदरचा ऐतिहासिक वारसा पुढील पिढीने जपावा यादृष्टीने शिवजयंती उत्सव आणि पारंपरिक गणेशोत्सवाचे आयोजन या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने उत्साहात होत आहे .
भोर शहरामध्ये भेलकेवाडीचे विठ्ठलमंदिर चहे प्रतिपंढरपूर या नावाने ओळखले जात आहे. आषाढी एकादशीला असंख्य भाविक या ठिकाणी मंदिरामध्ये विठ्ठल पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात, नवसाला पावणारा हा पांडुरंग अशी ओळख या भेलकेवाडीतील विठ्ठल मंदिराची आहे. महिन्याच्या प्रत्येक एकादशीला आरती ,रात्रीभजन कार्यक्रम होतो, अशा प्रकारच्या सांप्रदायिक कार्यक्रमामुळे भोर शहराच्या भेलकेवाडी मधील वातावरण पूर्ण वर्षभर भक्तिमय असते असे येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत (बाळु) खुटवड यांनी सांगितले.