भोर हेल्थ ॲन्ड सोशल फाउंडेशन व इनरव्हिलक्लब भोर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ .सुरेश गोरेगावकर यांच्या स्वर्गीय कै.शुभांगद गोरेगावकर मुलाच्या ३७ वाढदिवसानिमित्त भोर शहरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा पुढे करत रेनकोट व शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम गोरेगावकर हॉस्पिटलमध्ये गुरुवार (दि.१०) सायंकाळी करण्यात आला.
सदर संस्थेमार्फत भोर शहरातील चौपाटी , वाघजाई नगर परिसरातील कातकरी समाजातील गरीब गरजू २२ विद्यार्थ्यांना एक रेनकोट, दप्तर, जेवणाचा डबा शैक्षणिक साहित्य व खाऊ देण्यात आला. यावेळी डॉ सुरेश गोरेगावकर, डॉ प्रदीप पाटील , डॉ अमर भोर , विज्ञान शिक्षक केशव पवळे, डॉ धोंडे ,सोशल हेल्थ फाउंडेशनचे पदाधिकारी व इनरव्हिलक्लब संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा डॉ विद्या बुरांडे , माजी अध्यक्षा सविता कोठावळे , सचिव ॲड अश्विनी कुलकर्णी, विजया पाटील,सिमा मुकादम , डॉ विद्या कदम निशा पाटील, अनिता ताठे , डॉ , ताठे, डॉ.चिल्हाळ अधिकारी वर्ग उपस्थित होता.