सरपंच प्रवीण जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली निवड
भोर – तालुक्यातील शहरालगत लोकसंख्येने मोठ्या असलेल्या भोलावडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अविनाश विष्णू आवाळे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच जागेसाठी शनिवार (दि.५) निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी रेश्मा मंगेश आवाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. विद्यमान सरपंच प्रवीण जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी पद्माकर डोंबाळे यांनी निवडीचे काम पाहिले.
नवनिर्वाचित उपसरपंच रेश्मा मंगेश आवाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यमान सरपंच प्रवीण जगदाळे, माजी उपसरपंच तथा सदस्य गणेश आवाळे, माजी उपसरपंच अविनाश आवाळे, ग्रामपंचायत सदस्य मनोज मोरे, ज्ञानेश्वर तारु, प्रशांत पडवळ, पुष्पा आवाळे, भाग्यश्री सावंत, शुभांगी रणखांबे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन आवाळे, माजी सरपंच ज्ञानोबा आवाळे, शशिकांत जगदाळे, माजी उपसरपंच दत्तात्रय जगदाळे, मोहन आवाळे ,भरत आवाळे, धर्मा आवाळे , चंद्रकांत आवाळे, मंगेश आवाळे, रामचंद्र गावडे, धनंजय आवाळे चेतन आवाळे, जगन्नाथ बदक, दत्तात्रय अब्दागिरे, ज्ञानेश्वर शिंदे, नितीन आवाळे, संदिप जगदाळे आदी ग्रामस्थ तरुण उपस्थित होते.
” सरपंच प्रवीण जगदाळे यांच्या मार्फत उपसरपंचपदी राहुन गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील रहाणार आहे. महिला सक्षमीकरणावर विशेष भर देणार असुन महिलांसाठी गावात विविध उपक्रम राबवणार आहोत.”उपसरपंच रेश्मा आवाळे भोलावडे (ता.भोर)