खंडाळा : खंडाळा तालुक्यातील लोहोम येथे भैरवनाथ मंदिर व परिसरातील सुशोभीकरणाचे भूमिपूजन पुरुषोत्तम जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. मंगळवार दिं.५ रोजी श्री. भैरवनाथ जन्मदिनाचे औचित्य साधत हा कार्यक्रम घेण्यात आल्याने समस्त नाथ-भक्तांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
या सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पुरुषोत्तम जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाला आहे.
याप्रसंगी बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले की, ” खंडाळा तालुका नेहमीच समस्याग्रस्त राहिला आहे, निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी नेहमीच तालुक्याला मूलभूत गरजांपासून दूर ठेवले आहे तसेच कित्येक प्रलंबित प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले आहेत, हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले जात नसल्याने मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून पश्चिम भागाचा पाणीप्रश्न, नायगाव मांढरदेवी रस्ता, खंडाळा ट्रामा सेंटर तसेच तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी कटीबद्ध असून त्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत.” लोहम गावचे भूषण असलेले ग्रामपंचायत सदस्य कै अभिजीत गायकवाड यांच्या अचानक देवाघरी जाण्याने आपल्या सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
वास्तविक पाहता मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी अभिजीत यांनीच माझ्याकडे केली होती मात्र कामाच्या भूमिपूजनाप्रसंगीच ते आपल्यात नाहीत या गोष्टीचे दुःखही आहे परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हिच खऱ्या अर्थाने अभिजीतसाठी श्रद्धांजली असेल असे यावेळी पुरुषोत्तम जाधव म्हणाले.
याप्रसंगी मुंबई पोलीस दलातील महेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून लोहम गावातील कै. अभिजीत गायकवाड, कै. अशोक गायकवाड, कै.धोंडीबा गायकवाड, कै. ताराचंद गायकवाड, कै. प्रशांत गायकवाड, कै. अमित गायकवाड, कै. चंद्रकांत गायकवाड, कै. अभिजीत आवळे, कै. जितेंद्र मांढरे, कै. विकास भागवत, कैलासवासी सोमेश्वर भालचंद्र दीक्षित यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी लोहम गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.