भोर: केंद्र शासनाच्या हरघरतिरंगा उपक्रमांतर्गत भोर तालुक्यातील भाटघर व निरा देवघर धरणांना तिरंगा झेंडा लावून विद्युत रोषणाई करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरात स्वातंत्र्यदिनाची उत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र शासनाने #हरघरतिरंगा उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. याच अनुषंगाने भोर तालुक्यातील या दोन्ही धरणांना तिरंगा झेंडा लावून सजवण्यात आले.या अभियानाला पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, इंजिं. दिगंबरजी डूबल यांचे मार्गदर्शन लाभले.
या अभियानामुळे धरण परिसरात देशभक्तीची लाट उसळली. नागरिकांनीही आपापल्या घरांवर तिरंगा झेंडा लावून देशप्रेम व्यक्त केले. यामुळे स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करण्याची संधी मिळाली, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली