नसरापूर | प्रतिनिधी : जाणता राजा प्रतिष्ठान व आदित्य प्रकाश बोरगे मित्र परिवार यांच्या वतीने दिनांक १३ जुलै २०२५ रोजी, रविवार नसरापूर येथील जानकीराम मंगल कार्यालयात बालसंगोपन योजनेसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात सुमारे ३०० ते ४०० लाभार्थ्यांनी सहभाग घेतला.
या शिबिराचा उद्देश वडील नसलेल्या (एकल) किंवा आई-वडील दोघेही नसलेल्या (अनाथ) बालकांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देणे, पात्र बालकांसाठी प्रति महिना रु. २२५० ची आर्थिक मदत वयाच्या १८ वर्षांपर्यंत मिळावी यासाठी मदत व मार्गदर्शन करणे होता.
अर्ज प्रक्रियेत महिलांची होणारी धावपळ कमी करणे आणि जास्तीत जास्त महिला व बालकांना लाभ मिळवून देणे हा या शिबिरामागील केंद्रबिंदू होता, असे आदित्य बोरगे यांनी सांगितले.
या शिबिरात रविराज पाटील , विजय आबा कव्हे, सविता टापरे, बापू कुडले, शांताराम तात्या खाटपे यांचे मोलाचे योगदान लाभले. शिबिराचे नियोजन सुयोग्य व प्रभावी पद्धतीने पार पडले.
कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये .पोपटराव सुके साहेब, माजी सभापती दिनकर अण्णा सरपाले, जिल्हाप्रमुख प्रकाशजी भेगडे, दशरथजी गोळे, भारत नाना साळुंखे, विशाल जाधव, बाळासाहेब जायगुडे, स्वप्निल कोंडे, बाबूशेठ झोरे, सुधीर वाल्हेकर, गणेश दळवी, यशवंतराव कदम, बापूसाहेब शेटे, महेंद्र भोरडे, गणेश खुटवड, राकेश गाडे, अमोल मोरे, देवेंद्र शिळीमकर, योगेश कोंढाळकर, माऊली कोंडे, दादा मरळ, विकास जगताप, प्रवीण धावले, नितीन इंगुळकर, दिनेश जी राठोड, एड. संतोष बाठे, संतोष चोरघे, संदीप पांगारे, वाघ सर, नवनाथ गायकवाड, आकाश खाटपे, भानुदास थिटे, नागेश बोरगे, तुळशीराम थिटे, कुंडलिक बोरगे, अक्षय बोरगे, राज सरपाले, किरण जांभळे, हेमंत शिंदे, विनय आप्पा अढाव, सागर मरळ, संकेत साळुंखे, शिरीष मोडक, तुषार रगडे, अतुल बोरगे, जीवन बोरगे, निहाल राजपूत यांचा समावेश होता.
जाणता राजा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमामुळे हे शिबिर यशस्वी ठरले असून, लाभार्थी पालक व महिलांनी समाधान व्यक्त केले. हा सामाजिक उपक्रम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.