मराठी इंडस्ट्रीत अनेक दशके आपल्या अभिनयाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना खळखळून हसणाऱ्या अभिनेता अतुल परचुरेने अकाली एक्सिट घेतल्याने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्क रोगाशी सामना करीत होते. त्यातून ते बरे होऊन पुन्हा अभिनय करू लागले होते. मात्र, अचानक त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची उपारादरम्यान प्राणज्योत मालावली.
आज सकाळी त्यांचे पार्थिक अत्यंदर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले असून, जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, सचिन खेडेकर, निर्मिती सावंत, महेश मांजरेकर, सुबोध भावे, प्रिया मराठे, चंद्रकांत कुलकर्णी आदी कलाकारांनी त्यांचे अत्यंदर्शन घेतले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अतुल परचुरे यांचे अंत्यदर्शन घेतले.
निवेदता यांना अश्रू अनावर
माझा चांगला मित्र गेला…….. असे म्हणत जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना अश्रू अनावर झाले होते. आम्ही दोघांनी एकत्र रंगभूमीवरून अभिनयाची सुरूवात केली. टिळक आणि आगरकर हे आमचं व्यावसायिक रंगभूमीवरील पहिलं नाटक होतं. इट वाज अ फायटर इतक्या मोठ्या रोगाशी त्याने झुंज दिली. त्यातून बरा होऊन त्याने पुन्हा सुरूवात केली. अशा प्रकारचे रोल्सच कोणी करू शकणार नाही असं मला वाटतं नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.