बारामती (सनी पटेल ): बारामती तालुक्यातील एक गाव २ जानेवारी २०२५ रोजी एक धक्कादायक अत्याचार प्रकरण समोर आले आहे. फिर्यादी महिलेने तक्रार दिली की, आरोपी पोपट धनसिंग खामगळ याने तिला हॉटेलच्या कामासाठी पणदरे येथे बोलावले आणि तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला.
महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने २ जानेवारी सायंकाळी ४ वाजता गोड बोलून आणि कामाचे आमिष दाखवून महिलेला पणदरे येथील हॉटेलमध्ये कामावर बोलावले. त्यानंतर, ३ जानेवारीच्या पहाटे ३ वाजता आरोपी खामगळ महिलेच्या पत्र्याच्या खोलीत बळजबरीने घुसला. तिथे त्याने महिलेवर मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
या घटनेवर थांबले नाही, तो महिलेवर पुढील पाच ते सहा वेळा शारीरिक अत्याचार करत राहिला. त्याचवेळी, खामगळने महिलेचे कानातील सोन्याचे रिंग, आधारकार्ड, २,००० रुपये आणि एक विवो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने लांबवला.
१० जानेवारी २०२५ रोजी, आरोपीने पुन्हा एकदा महिलेवर मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. यावेळी, त्याने आणखी एका हॉटेल कर्मचारी महिलेला अत्याचार करण्यासाठी मदत करण्याचा आग्रह केला आणि महिलेचा धाक धरून तिला धमकावले.
महिलेने या सर्व अत्याचारांची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत खामगळला अटक केली आणि त्याच्यावर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. माळेगाव पोलीस आरोपीच्या विरोधात अधिक तपास करत आहेत.