भोर: राजगड तालुक्यातील माणगाव येथील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल संभाजी जगताप यांनी भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवराज शेंडकर, विकास पासलकर, जितेंद्र साळुंके, राजेंद्र कडू , नानासाहेब राऊत , गणेश जागडे यांच्या प्रयत्नातून अनिल जगताप यांनी थोपटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
सैनिक समाज पार्टी या पक्षाचे वतीने भोर विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवार म्हणून जगताप हे जहाज या निवडणूक चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात होते.
परंतु, भोर विधानसभेच्या रिंगणात संग्राम अनंतराव थोपटे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असून भोर विधानसभा मतदार संघामध्ये केलेला विकास तसेच त्यांचा जनसंपर्क पाहुन त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगत संग्राम थोपटे यांना जाहीर पाठींबा दिला आहे. नसरापूर येथील प्रचार सभेत जाहीर पाठिंबा जगताप यांनी संग्राम थोपटे यांना दिला आहे.


















