नसरापूर, : भोर यांच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्हास्तरीय रायरेश्वर श्री 2025 व भोर श्री (तालुका मर्यादित) स्पर्धा भव्य स्वरूपात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत आयोजित या शरीरसौष्ठव स्पर्धेत 150 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे आयोजन देवेश वाडकर, दशरथ जाधव युवा मंच आणि बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन पुणे यांनी संयुक्तपणे केले होते.
अतिशय चुरशीच्या स्पर्धेत रायरेश्वर श्री 2025 चा मानकरी ऑक्स्झिमचा अक्षय शिंदे ठरला, तर भोर श्री 2025 चा किताब बॉडी फॅक्टरी जिमच्या मनीष कांबळेने पटकावला. बेस्ट पोजरचा पुरस्कार महारुद्र जिमच्या सचिन हगवणे यांना देण्यात आला.
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. नसरापूर सरपंच उषाताई कदम, शिवसेना मुळशी तालुकाप्रमुख दीपक करंजावणे, माझी उपसभापती सुनील भेलके, भोर विधानसभा प्रमुख गणेश मसुरकर, दादा कोंडके चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष निलेश पांगारकर आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यांनी तरुणांना फिटनेसकडे लक्ष देऊन व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे:
- भोर श्री 2025 – 1) मनीष कांबळे, 2) सागर कामठे, 3) ओंकार खोपडे
- 55 किलो गट – सैफ खान
- 60 किलो गट – अमोल वायाळ
- 65 किलो गट – ज्ञानेश्वर वाघमारे
- 70 किलो गट – प्रशांत कोराळे
- 75 किलो गट – अमर पडवळ
- 80 किलो गट – सचिन हगवणे
80 किलोवरील गट – अक्षय शिंदे
या स्पर्धेत महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे खजिनदार अजय गोळे, उपाध्यक्ष शरद मारणे, पुणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मंगेश परदेशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन किरण जाधव व युनूस काझी यांनी केले.