बारामतीः विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असताना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात उतरून अजित पवार यांचा प्रचार करताना दिसत आहेत. गेल्या २० दिवसांपासून त्या बारामती तालुक्यातील गावे, वाड्या वस्त्यांना भेट देत नागरिकांशी संवाद साधत असून, अजित दादांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी बारामती तालुक्यातील एकूण ४५ गावे त्यामधील वाड्या वस्त्यांचा दौरा केला आहे. या दौऱ्याला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळताना दिसत असल्याचे सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
गेल्या वीस दिवसांपासून तालुक्याती गावांना वाड्या वस्त्यांना भेट देत दादांचा प्रचार करीत आहे, या प्रचाराला रॅलीला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद प्रचाराला मिळताना दिसत आहे. या रॅलीत महिला, लहान मुलं, तरुण अगदी वस्यस्कर लोकं सुद्धा सहभागी होत असल्याचे सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या. तसेच लाडक्या बहिण योजनेचा खूप मोठा फायदा या निवडणुकीला होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. बारामती तालुक्यातील विधानसभेसाठीची लढत पुन्हा एकदा पवार कुटुंबाभोवती फिरताना दिसत आहे. काका विरूद्ध पुतण्या अशी ही लढत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.