भोर: शहर काँग्रेसमध्ये सध्या इन्कमिंग वाढली असून, अनेकजण राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला असून, राष्ट्रवादीचे शहर युवक उपाध्यक्ष प्रशांत दिपक पवार हे काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे.
शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत दिपक पवार यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मा. उपनगराध्यक्ष सुमंत शेटे, नगरसेवक बजरंग शिंदे, शांताराम पवार, अण्णा मळेकर, दिपक धोत्रे उपस्थित होते.